Join us
Daily Top 2Weekly Top 5

सविता दामले यांना महिला गौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:08 IST

मुंबई - ज्येष्ठ अनुवादक सविता दामले यांना नुकताच महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व महाराष्ट्र ...

मुंबई - ज्येष्ठ अनुवादक सविता दामले यांना नुकताच महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष होते.

पुरस्कार सोहळ्यास ज्येष्ठ लेखिका संजीवनी खेर, चित्रपट निर्मात्या कांचन अधिकारी, महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या रेखा नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. गौरव पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन जयश्री आपटे यांनी केले. सामाजिक विषय़ावर कविता भडके यांनी आहारशास्त्र आणि जनजागृती तर पूजा कारेकर यांनी हरविलेले बालपण आणि वैशाली चेके-पाटील यांनी सामाजिक कार्य व समस्या विषयावर आपले विचार व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी खेर आणि प्रमुख पाहुण्या कांचन अधिकारी यांची समयोचित भाषणे झाली.