Join us

सितारादेवी यांच्या नावे पुरस्कार

By admin | Updated: November 28, 2014 02:10 IST

नृत्य क्षेत्रत त्यांच्या नावाने दरवर्षी प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

मुंबई : ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी आणि त्यांच्या कथ्थक क्षेत्रतील योगदानाचा आदर कायम राखण्यासाठी राज्य शासनातर्फे नृत्य क्षेत्रत त्यांच्या नावाने दरवर्षी प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. कथ्थक नृत्याच्या उपासिका सितारादेवी यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी नेपियन्सी रोड येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले आणि आदरांजली अर्पण केली. सितारादेवी यांना श्रद्धांजली वाहताना तावडे म्हणाले, कथ्थक क्षेत्रत सितारादेवी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सतारादेवी यांनी त्यांची मोठी बहीण तारा, शंभू महाराज आणि अच्छन महाराज (पं. बिरजू महाराज यांचे वडील) यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. (प्रतिनिधी)