नवी मुंबई : महापालिका शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावत आहे. घनकचऱ्यासाठी उभारलेल्या प्रकल्पाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. याच प्रकल्पासाठी महापालिकेस ईपीसी वर्ल्ड पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तुर्भेमध्ये महापालिकेने घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक क्षेपणभुमी तयार केली आहे. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर खत व फ्यएल पॅलेटमध्ये करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २००० अन्वये शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. पालिकेने तीस वर्षासाठी बांधा वापरा व हस्तांतर करा या तत्वावर हा प्रकल्प उभारला आहे. यापूर्वी क्षेपणभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेस महिन्याला २९ लाख रूपये खर्च येत होता. पालिकेचा हा खर्च आता कमी झाला आहे. पालिकेच्या या प्रकल्पाचे पर्यावरणप्रेमी संस्थांनीही कौतुक केले आहे. देशभरातील महापालिका व नगरपालिकेचे प्रतिनिधी हा प्रकल्प पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. या प्रकल्पाची दखल घेऊन पालिकेस ईपीसी वर्ल्ड हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी पुरस्कार
By admin | Updated: December 21, 2014 00:56 IST