Join us

महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर ॲवॉर्ड २०२१ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ ऑगस्ट २०२१ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये होणाऱ्या ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेत हा पुरस्कार दिला जाईल. नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी व उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सांघिक व्यवस्थापन आणि शाश्वत व निरंतर प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो.

दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून २३ जानेवारी २०२० रोजी रुजू झाले आहेत. सध्या ते ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २७ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून बी.ई. केले आहे. ते आयआयटी खरगपूरचे एमटेक इंजिनीअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एमएस्सी केले आहे. त्यांना संघबांधणी, प्रकल्प नेतृत्व, प्रशासन आणि व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आहे.

..............................................