मुंबई : धारदार मांजासह नायलॉन मांजामुळे पक्षी आणि मनुष्य प्राण्याला इजा पोहोचत असल्याने मकरसंक्रांतीदिवशी पतंग उडविण्यासाठी साधा मांजा वापरण्यात यावा; असे आवाहन पक्षिमित्र संस्थांनी केले आहे. शिवाय धारदार मांजामुळे पक्षी-प्राणी जखमी आढळल्यास पक्षी-प्राणी मित्र संघटनांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.मकरसंक्रांतीदिवशी पतंग उडविण्याकरिता पतंगप्रेमींकडून धारदार मांजा अथवा नायलॉन मांजा वापरला जातो. हा मांजा झाडांसह उर्वरित ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत राहिल्याने त्यापासून हानी होण्याची दाट शक्यता असते. विशेषत: आकाशात घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांना हा मांजा हानी पोहोचवितो. शिवाय रस्त्याहून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना रस्त्यावर लटकणारा हा धारदार मांजा हानी पोहोचवितो. (प्रतिनिधी)
पक्ष्यांवरील संक्रांत टाळा!
By admin | Updated: January 15, 2015 02:16 IST