Join us  

प्लॅस्टिकचा वापर टाळा, पैसे वाचवा; वर्सोव्याचे तरुण राबवतात प्लॅस्टिक विरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 7:17 PM

मुंबई आणि उपनगरात सध्या टनावरी  प्लास्टिक हे नाल्यामार्फत समुद्रात जात असल्याने समुद्रातील कचऱ्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- प्लॅस्टिकचा वापर टाळा, पैसे वाचवा अशी हाक देत वर्सोव्याचे तरुण  प्लॅस्टिक विरोधी मोहिम राबवत आहे.अनेक नागरिक व पर्यटक खाऊचे रॅपर जमा झालेला तत्सम प्लास्टिक कचरा तेथेच फेकतात. यामुळे निसर्ग पर्यायाने  पर्यावरण धोक्यात येते आहे. हाच धोका ओळखून  येथील तरुणांनी स्वच्छतेसह प्लॅस्टिक विरोधी जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे.

मुंबई आणि उपनगरात सध्या टनावरी  प्लास्टिक हे नाल्यामार्फत समुद्रात जात असल्याने समुद्रातील कचऱ्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. या कचऱ्याचा त्रास मुंबईच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांपासून ते सागरी किनार्‍यावर पर्यटनास येणार्‍या पर्यटकांना होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येथील तरुणांनी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अंधेरी पश्चिम परिसरातील प्रत्येक घराला,येथील हॉटेल्सला हे अँप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अँपच्या माध्यमातून येथील ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी पालिकेला आम्ही सहकार्य करणार आहे.ओला व सुका कचरा वेगळा करणाऱ्या सोसायटीच्या नागरिकांना,हॉटेल्स,आईस्क्रीम पार्लर यांना प्रोत्साहन म्हणून कूपनच्या माध्यमातून त्यांना ताज्या भाज्या व फळे देण्यात येतील अशी ही अभिनव योजना आहे.येथील नागरिकांना, हॉटेल्स, आईस्क्रीम पार्लर आदी आस्थापनांना याचा फायदा मिळेल असा विश्वास गणेश ठाकूर व बाबासाहेब सातकर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी परिसरात नुकतीच सेव्ह प्लॅस्टिक,सेव्ह मनी  हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात पालिकेच्या के / पश्चिम वॉर्डचे घनकचरा खात्याचे अधिकारी बांगर व परिसरातील नागरिक सहभागी या मोहिमेत झाले होते. त्यांनी यापुढे सुद्धा या कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या घरात साचवलेले प्लास्टिक जमा करून त्या बदल्यात भाजी स्वीकारण्याच्या या उपक्रमात खूप मोठा प्रतिसाद दिला.

भविष्यात प्लॅस्टिक मुक्त मुंबई व महाराष्ट्र करण्याचा आमचा मानस असून युवा सेना विभाग अध्यक्ष मोहित पेडणेकर हे सुद्धा मोलाचे सहकार्य करत असल्याचे गणेश ठाकूर व बाबासाहेब सातकर यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीमहाराष्ट्र