Join us

‘आव्हाडांसारख्यांनी डावखरेंचे नाव संपवण्याचे काम केले’

By admin | Updated: September 14, 2014 01:04 IST

‘वसंत डावखरे यांचे नाव संपवण्याचे काम जितेंद्र आव्हाडांसारख्यांनी केले,’ असा आरोप ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी ठाण्यातील काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात केला.

ठाणो : ‘वसंत डावखरे यांचे नाव संपवण्याचे काम जितेंद्र आव्हाडांसारख्यांनी केले,’ असा आरोप ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी ठाण्यातील काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात केला. शिवसंग्राम मेळाव्यात ते बोलत होते. चमचेगिरी करणा:या कार्यकत्र्याना राष्ट्रवादीत स्थान दिले जात असल्याचेही ते म्हणाले.
‘आम्ही सत्तेला लाथ मारून महायुतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीने लवकरात लवकर जागावाटपाचा तिढा सोडवून आम्हालाही मान-सन्मान द्यावा’, असे आवाहनही त्यांनी केले. आघाडी सरकारला हटवण्याची वेळ आल्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.