Join us
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या सरासरी पर्जन्यमानात वाढ

By admin | Updated: June 14, 2015 23:23 IST

मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अधिक सरासरी गाठली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे

अलिबाग: मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अधिक सरासरी गाठली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ३३६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक ७० मि.मी. पावसाची नोंद मुरुड येथे झाली आहे. मुरुड ७० मि.मी,अलिबाग ३८ मि.मी, पनवेल ३४, म्हसळा २८, तळा २५, रोहा २२, पोलादपूर २०, माणगांव १९, खालापूर १८ ,सुधागड १५, उरण १४, श्रीवर्धन १३, महाड १२, पेण ६.३०, कर्जत १.५० आणि गिरीस्थान माथेरान ० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाऊस अशाच प्रकारे स्थिरावत गेला तर पेरण्यांना हा पाऊस फायद्याचा ठरेल असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतो आहे, तर काही प्रमाणात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. (विशेष प्रतिनिधी)