ठाणे : ठाणे बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि वैष्णवी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घोडबंदर रोड परिसरात गुरुवारी घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अवधेश यादव हा महाराष्ट्र महोत्सव श्री २०१५ चा मानकरी ठरला. तर बेस्ट पोझर म्हणून विशाल चौगुलेला गौरवण्यात आले. सहा वजनी गटांत ८० हून अधिक शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते.याचदरम्यान, स्प्रिंग बॉडी प्रीतम, नेहा आणि खारघरचा राजा ग्रुप (सलोनी परब ) यांनी आपला नृत्याविष्कार सादर केला. तसेच भार्इंदर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘व्यसनमुक्ती व अमली पदार्थाविरुद्ध जनजागृती’ पथनाट्य सादर केले. (प्रतिनिधी)विजेते४५५ किलो वजनी गट - रोशन तटकरे४६० किलो वजनी गट - सुनील गायकर४६५ किलो वजनी गट - व्यंकटेश मालप्पा४७० किलो वजनी गट - विशाल चौगुले४७५ किलो वजनी गट - अवधेश यादव
अवधेश यादव महाराष्ट्र महोत्सव श्री
By admin | Updated: February 7, 2015 23:28 IST