Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:17 IST

लोकमत न्यूज नेटवरमुंबई : शेजारी राहणारी महिला आणि तिच्या मुलीबाबत अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रिक्षाचालकाला कुरार पोलिसांनी गुरुवारी दुसऱ्यांदा ...

लोकमत न्यूज नेटवर

मुंबई : शेजारी राहणारी महिला आणि तिच्या मुलीबाबत अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रिक्षाचालकाला कुरार पोलिसांनी गुरुवारी दुसऱ्यांदा अटक केली.

युसूफ खान (३२) असे अटक रिक्षाचालकाचे नाव आहे. तो कुरारमध्ये राहत असून त्याच परिसरात ४४ वर्षीय पीडित महिला आणि तिची २२ वर्षांची मुलगी राहते. खान हा महिलेला पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. अखेर महिलेने या प्रकरणी कुरार पोलिसांत तक्रार दाखल. त्यानुसार पुन्हा असे करणार नाही आणि केल्यास ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे त्याच्याकडून बॉण्डपेपरवर लिहून घेण्यात आले. त्यानंतर काही दिवस तो गप्प होता. मात्र नंतर त्याने महिलेच्या मुलीबाबतही तसाच प्रकार सुरू केला. दोन दिवसांपूर्वी ती काही कामानिमित्त बाहेर जात असताना तिच्या दिशेने दगड भिरकावला. शिवीगाळ करीत कोणाला काही सांगितल्यास तुझे आयुष्य खराब करेन, अशी धमकी दिली.

मुलीने याबाबत आईला सांगताच त्यांनी पाेलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक करीत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.