Join us

विद्यापीठाच्या दोन विभागांना स्वायत्तता

By admin | Updated: September 24, 2014 03:15 IST

समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागाला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावाला मुंबई विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई : उच्च शिक्षणात वेगळा ठसा उमटविणारे रूईया आणि मालाड येथील नागेंद्र खांडेवाल महाविद्यालयांसह विद्यापीठाच्या समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागाला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावाला मुंबई विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.मुंबई विद्यापीठाने नॅकने अ दर्जा दिलेल्या सलंग्नित महाविद्यालयांना स्वायत्ततेच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एका शिबिराचे आयोजन केले होते. त्या वेळी स्वायत्तेची प्रक्रिया आणि स्वायत्तेसंबंधीची सर्व माहिती देण्यात आली होती. (प्रतिनिधी)