Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया संघ सराव करणार ‘भारतीय खेळपट्टय़ांवर’!

By admin | Updated: June 5, 2014 00:50 IST

जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतातील कामगिरी सुधारण्यासाठी नवी योजना आखली आहे.

सिडनी : जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतातील कामगिरी सुधारण्यासाठी नवी योजना आखली आहे. त्यासाठी त्यांनी खेळपट्टी तयार करण्यासाठी भारतातून माती आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाला यापूर्वीच्या भारत दौ:यात क्-4 ने पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने 2क्क्6 नंतर भारतीय उपखंडात 13 कसोटी सामने खेळले, पण त्यापैकी त्यांना केवळ एक सामना जिंकता आला. ऑस्ट्रेलियाने 2क्11 मध्ये गॉल कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता.  मायदेशात खेळल्या गेलेल्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा 5-क् ने पराभव केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्या भूमीत पराभव करीत कसोटी मानांकनामध्ये अव्वल स्थान पटकाविले. अव्वल स्थानासाठी ऑस्ट्रेलियापुढे विदेशात चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतातून माती आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या मातीपासून ब्रिसबेन येथील नॅशनल क्रिकेट सेंटरमध्ये सरावासाठी आशियाई शैलीच्या खेळपट्टय़ा तयार करण्याची योजना आहे.