बडेजाव नाही : झाडाझडती तर नाहीच नाही, केवळ एक सुरक्षा रक्षक
राहुल रनाळकर - मुंबई
पंतप्रधान म्हटले की सुरक्षेचा भलामोठ्ठा ताफा हा आलाच. ङोड प्लस, ङोड प्लस-प्लस, एनएसजी, स्पेशल टास्ट फोर्स शिवाय अनेक स्तरीय सुरक्षेचे जाळे हे ओघानेच आले. ही अतिप्रचंड सुरक्षा आता सर्वाच्याच परिचयाची झाली आहे. पण ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबट हे या सगळ्या बडेजावाला अपवाद ठरले आहेत.
मुंबई विद्यापीठातील कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट हे येथे दाखल झाले होते. नित्यक्रम चुकू द्यायचा नाही, हे जणू या मोठय़ा व्यक्तींचे अंगभूत स्वभाववैशिष्टय़. त्यामुळेच ते उतरलेल्या ताज हॉटेलच्या जिममध्ये ते सकाळीच व्यायामासाठी दाखल झाले. त्यांच्याबरोबर केवळ एक सुरक्षा रक्षक जिममध्ये होता. तर हॉटेलच्या बाहेर थोडाफार जाणवणारा सुरक्षेचा ताफा होता. योगायोगाने विशेष सरकारी वकील उज्जवल निकम हेही त्याच वेळेस व्यायामासाठी ताजच्या जिममध्ये पोहोचले. बाहेरचे चार गोरे सुरक्षा रक्षक बघून उज्जवल निकम यांनी ट्रेनरला विचारणा केली, ‘कोणी खास आलंय का?’ ट्रेनर उत्तरला, ‘हो, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान.’ निकम म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियन पंतप्रधान? कुठे आहेत ते?’ ट्रेनर उत्तरला, ‘तुमच्या बाजूच्या ट्रेड मिलवर धावणारेच टोनी अॅबट आहेत..’ निकम यांना प्रश्न पडला की, ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च स्थानी असलेली व्यक्ती.. इतकी साधी आणि लो-प्रोफाईल असूच कशी शकते? किंबहुना त्यांचा हा साधेपणा व दिनचर्येत खंड पडू न देण्याचा हा शिरस्ताच त्यांच्या यशाचे रहस्य असावे.
सुमारे तासभर वर्कआऊट
अत्यंत शांतपणो ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अॅबट यांनी सुमारे तासभर वर्कआऊट केले. 1क् ते 15 मिनिटे स्ट्रेचिंगही त्यांनी केले. स्ट्रेचिंग करताना वापरलेले मॅटही त्यांनी उचलून ठेवल्याचे उज्जवल निकम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
नेत्यांनी अनुकरण करावे..
एवढा साधेपणा आपल्या नेत्यांमध्ये यायला काय हरकत आहे? सुरक्षेचा बडेजाव मिरवला की आपण कोणीतरी आहोत, असे नेत्यांना वाटू लागले.
-उज्जवल निकम, विशेष सरकारी वकील