Join us  

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:34 AM

महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली. मतदारसंघात तत्काळ प्रभावाने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.या मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत २९ आॅगस्टला संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ आॅगस्ट असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ५ आॅगस्ट आहे. मतमोजणी २२ आॅगस्ट रोजी होईल.