Join us

पर्यटकांना घेऊन ‘नीलांबरी’ धावणार!

By admin | Updated: November 2, 2014 00:42 IST

पर्यटकांना मुंबईची सैर घडविणा:या ‘नीलांबरी’ या ओपन डेक बसचा शुभारंभ नुकताच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केला.

मुंबई : पर्यटकांना मुंबईची सैर घडविणा:या ‘नीलांबरी’ या ओपन डेक बसचा शुभारंभ नुकताच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केला. गतकाळातील मुंबईचे आता बदलत चाललेले रूप आणि तरीही तिचे टिकून असलेले स्थापत्य वैभव अनुभवण्याची संधी पर्यटकांना या बसच्या माध्यमातून मिळणार आहे.
केवळ वीकेन्डला पर्यटकांना या अनोख्या ‘नीलांबरी’ची मनोरंजक सैर करता येणार आहे. शनिवार आणि रविवारी सायंकाळी 7 ते रात्री 9:15 या वेळेत ही सफर होणार आहे. याकरिता बसचे आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात किंवा गेटवे ऑफ इंडिया येथील काउंटरवर याचे तिकीट उपलब्ध होणार आहे. या बसमधील अपर डेकसाठी प्रति व्यक्ती 18क् रुपये तर लोअर डेकसाठी प्रतिव्यक्ती 6क् रुपये असे तिकीट आकारण्यात येणार आहे.
‘नीलांबरी’ गेटवे ऑफ इंडिया येथून सफरीला आरंभ करीत मंत्रलय, ऑबेरॉय हॉटेल, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट स्थानक, इरॉस सिनेमागृह, ओव्हल मैदान, राजाबाई टॉवर, सीएसटी स्थानक, हुतात्मा चौक, होमी मोदी मार्ग, हार्निमन सर्कल, एशियाटिक सोसायटी अशी मार्गक्रमणा करेल. दरम्यान, या टूरमध्ये चर्चगेट स्थानक मुख्यालय, राजाबाई टॉवर, उच्च न्यायालय या इमारतींचे स्थापत्यशास्त्र, रचना आणि वैशिष्टय़े पर्यटकांना पाहता येतील. (प्रतिनिधी)