Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतुल बर्वे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले वरिष्ठ अधिकारी अतुल बर्वे यांचे रविवारी कोरोनाने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले वरिष्ठ अधिकारी अतुल बर्वे यांचे रविवारी कोरोनाने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. मनोरंजन क्षेत्रातील नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांचे ते काका होते. ख्यातनाम लेखक व नाटककार, दिवंगत अनिल बर्वे; त्याचप्रमाणे दूरदर्शनचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत बर्वे यांचे ते बंधू होते.

अतुल बर्वे यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मधून त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर खासगी बँकांमध्येही यशस्वी कामगिरी पार पाडली. टाइम्स ऑफ इंडिया बँक, आयडीबीआय बँक आणि एचडीएफसी बँकेतही त्यांनी वरिष्ठ पदावर काम केले होते. निवृत्तीनंतर बँकिंग सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाने बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना या क्षेत्रात व्यक्त होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------