Join us

ईडीच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: November 28, 2014 01:56 IST

लिलावती रुग्णालयाच्या संस्थापकांचे पुत्र किशोर मेहता यांना अंतरिम जामीन मिळाला असला तरी त्याची दैनंदिन सुनावणी शनिवारी होणार आहे.

मुंबई : हिरे निर्यातीसंदर्भात सक्तवसुली संचालयानलयाने (ईडी) केलेल्या कारवाईत लिलावती रुग्णालयाच्या संस्थापकांचे पुत्र किशोर मेहता यांना अंतरिम जामीन मिळाला असला तरी त्याची दैनंदिन सुनावणी शनिवारी होणार आहे. त्यामुळे मेहता यांच्या तब्बल वीस लाख अमेरिकन डॉलरच्या हि:यांच्या निर्यातीबाबत ईडी नेमकी काय बाजू मांडणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. कारण हा व्यवहार स्पष्ट न झाल्यानेच ईडीने मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वांद्रे येथील लिलावती रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणावरून मेहता कुटुंबात वाद सुरू आहे. धर्मादाय आयुक्तांकडे याची सुनावणी सुरू आहे. 
त्यातच रुग्णालयाचे माजी विश्वस्त मेहता यांनी 1995-2क्क्2 या काळात दुबई व हाँगकाँग येथे निर्यात 
केलेल्या हि:यांची ईडीने दखल घेतली. या व्यवहारप्रकरणी ईडीने मेहता यांच्याविरोधात गुन्हा 
नोंदवला. मात्र याच्या चौकशीसाठी मेहता हे सहकार्य करत नसल्याने 
ईडीने थेट न्यायलायाकडून त्यांच्याविरोधात अजामीन पात्र 
वॉरंट जारी करून घेतले. त्यामुळे 
अखेर मेहता यांना बुधवारी अटक झाली.
त्यानंतर मेहता यांना तत्काळ महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यापाठोपाठ मेहता यांनी जामीनासाठी अर्ज केला. याला सरकारी पक्षाने विरोध केला. 
हे प्रकरण गंभीर असून त्यात दोषी आढळल्यास तीन वर्षार्पयतच्या शिक्षेची तरतूद आहे. तेव्हा मेहता 
यांना जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तर ईडीने देखील मेहता हे तपासाला सहकार्य करत नसल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.  
(प्रतिनिधी)
 
मेहता यांना ईडीचे चौकशीचे समन्स कधी मिळालेच नाही. कारण हे समन्स दुस:याच्या नावे व पत्त्यावर जात होते. त्यामुळे मेहता यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी मेहता यांचे वकील आबाद पौंडा यांनी केली. ती ग्राह्य धरत न्यायालयाने मेहता यांना दोन लाखांचा अंतरिम जामीन मंजूर केला व ही सुनावणी येत्या शनिवारीर्पयत तहकूब केली.