Join us

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या तरुणाला जुहू पोलिसांनी बुधवारी अटक केली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या तरुणाला जुहू पोलिसांनी बुधवारी अटक केली. अनिकेत पाटील (वय ३०) असे त्याचे नाव असून, तो गोरेगावच्या एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करतो. रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला विरोध असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणातील अन्य आरोपी हा दिल्लीतील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.अनिकेतने मोबाइलमध्ये फेसबुकवर चॅट करताना त्याच्या मनातील राग व्यक्त करीत, मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीबद्दल फेसबुक व टिष्ट्वटरवर आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करीत त्याचा शोध लावला. गोरेगावमधील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. अनिकेत हा अविवाहित असून, रागाच्या भरात त्याने ही पोस्ट टाकल्याचे चौकशीमध्ये उघड झाले. मात्र, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याला बुधवारी जामीन मंजूर झाला़

टॅग्स :अटक