Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीमध्ये दिसला हल्लेखोर

By admin | Updated: June 7, 2014 00:41 IST

चर्चगेटच्या दिशेने जाणा:या एका लोकलमध्ये पहाटेच्या सुमारास महिला प्रवाशावर हल्ला करून दागिने लुटण्याची घटना घडली.

मुंबई : चर्चगेटच्या दिशेने जाणा:या एका लोकलमध्ये पहाटेच्या सुमारास महिला प्रवाशावर हल्ला करून दागिने लुटण्याची घटना घडली. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली असून, स्थानकांवर असणा:या सीसीटीव्ही फूटेजमधून हल्लेखोर दिसल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
भाईंदर पूर्व येथे राहणा:या अपूर्वा मेधा (25) या पहाटेच्या वेळी नोकरीवर जाण्यासाठी नेहमीप्रमाणो घराबाहेर पडल्या. चर्चगेटच्या दिशेने जाणा:या लोकलमधून सेकंड क्लास महिलांच्या राखीव डब्यातून त्या प्रवास करीत होत्या. अपूर्वा या डब्यात एकटय़ाच असताना साधारण 4.55च्या सुमारास भाईंदर स्थानक सोडताच काही सेकंदांतच थांबलेल्या या लोकलमध्ये एक चोर चढला आणि त्याने एकटय़ा असलेल्या अपूर्वा यांच्याकडे पैसे आणि दागिन्यांची मागणी करत त्यांना जबर मारहाण केली. यात त्यांच्याकडील सर्व दागिने लुटून दहिसर स्थानकात उतरून त्याने पोबारा केला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 
मीरा रोड ते बोरीवलीर्पयतचा स्थानक आणि परिसर रेल्वे पोलिसांकडून पिंजून काढला जात आहे. तसेच आतार्पयत संशयित म्हणून 25 जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
 
रेल्वे पोलिसांकडून स्थानकांवरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आल्यानंतर एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये फिर्यादी महिलेने दिलेल्या वर्णनावरून आरोपी दिसल्याचे पोलीस निरीक्षक पी.आय. भांगरे यांनी सांगितले. त्यावरून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.