मुंबई : भररस्त्यात ३६ वर्षांच्या महिलेवर चाकूने हल्ला चढविल्याची घटना रविवारी रात्री अॅण्टॉपहिल येथे घडली. महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अॅण्टॉपहिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत, अधिक तपास सुरू केला आहे.अॅण्टॉपहिल येथील बंगालीपुरा परिसरात चांदुबानू नुरमोहम्मद फकिर या कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी रात्री ८च्या सुमारास येथील सेक्टर २मधून त्या जात असताना, एका इसमाने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. नागरिक जमताना पाहून हल्लेखोराने पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने चांदुबानू यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हातावर, कंबरेवर आणि पोटावर वार करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्यातून आरोपीने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
अॅण्टॉपहिलमध्ये महिलेवर हल्ला
By admin | Updated: January 24, 2017 06:15 IST