Join us
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दाम्पत्यावर हल्ला

By admin | Updated: May 5, 2017 06:36 IST

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या लुटारुंनी वृद्ध दाम्पत्यावर हल्ला चढवित त्यांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक

मुंबई : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या लुटारुंनी वृद्ध दाम्पत्यावर हल्ला चढवित त्यांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना गिरगावात घडली आहे. यामध्ये बबन सिवुरकर (८०)हे जखमी झाले आहेत. गिरगाव येथील मुगभाट लेन परिसरात सिवुरकर हे ७५ वर्षीय पत्नी अनुराधा यांच्यासोबत राहतात. दुपारी सव्व्वा तीनच्या सुमारास एका तरुणाने दुरुस्ती करायची असल्याचे सांगत घरात प्रवेश केला. वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत घरातील ५३ हजार रुपये किंमतीचे दागिन्यांची चोरी केली. त्यांना विरोध केला म्हणून दाम्पत्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये बबन यांच्या पोटावर चाकू लागला. ते खाली कोसळताच आरोपीने पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच व्ही.पी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध लुटमारीचाह गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु आहे. (प्रतिनिधी)