ठाणे : ठाणे महापालिका काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांच्यावर कार्यालयाजवळच एका दुकलीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात जखमी झालेल्या घाडीगावकरांना रुग्णालयात दाखल केले असून पसार दुकलीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.घाडीगावकर आपला मित्र रविंद्र पाटीलसह कार्यालयातून शुक्रवारी रात्री घरी पायी जात होते. याच दरम्यानआलेल्या एका दुकलीने लोखंडी सळईने त्यांच्या डोक्यात आणि पाठीवर मारले. तसेच पाटील यांच्या पाठीवर सळईने मारून ते पळून गेले. या प्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अद्यापही कोणाला अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}