Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 16:44 IST

मुंबई, दि. 4- मुंबई महापालिकेच्या के पूर्वचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर अंधेरी परिसरात बुधवारी संध्यकाळी हल्ला करण्यात आला. ...

मुंबई, दि. 4- मुंबई महापालिकेच्या के पूर्वचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर अंधेरी परिसरात बुधवारी संध्यकाळी हल्ला करण्यात आला. जैन हे याठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला. 

या हल्ल्यात माथाडी कामगारांचा समावेश असल्याची माहिती असून पालिने नोटीस न देताच कारवाईचा बडगा उगरल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी जैन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केल्याचे समजते. माथाडी कामगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेही हॉकर्स युनियनचे प्रमुख जय सिंग यांनी लोकमतला सांगितले.