Join us

अथर्व शिंदेला बर्थडे पार्टीत मारहाण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 06:13 IST

आरे परिसरात मृतावस्थेत आढळून आलेल्या अथर्व शिंदेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो गेलेल्या पार्टीच्या ठिकाणी त्याला मारहाण झाली नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : आरे परिसरात मृतावस्थेत आढळून आलेल्या अथर्व शिंदेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो गेलेल्या पार्टीच्या ठिकाणी त्याला मारहाण झाली नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अथर्वचा मृत्यू मारहाणीमुळे की नशेत पडून गंभीर दुखापत झाल्याने झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. साहजिकच, आता पोलीस फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.६ मे रोजी आरेतील ज्या बंगल्यात पार्टी झाली होती, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले आहेत. त्यामध्ये अथर्व मैत्रिणीसोबत एका ठिकाणी बसल्याचे दिसून येते, तो संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तेथून निघून गेला. तोपर्यंत त्या ठिकाणी मारहाणीची कोणतीही घटना घडलेली नव्हती, असे फुटेजमध्ये आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता पोलीस फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. अथर्वच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने तो तिच्यासोबत आरेतील रॉयल पाम परिसरात पार्टीला गेला होता. त्यानंतर, मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. अथर्व हा मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी नरेंद्र शिंदे यांचा एकुलता एक मुलगा होता.बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमधून उघडपोलिसांना प्रतीक्षा फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची