Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषी बनला क्राइम ब्रांच अधिकारी

By admin | Updated: September 5, 2015 02:09 IST

‘इंदौरमध्ये एका महिलेचा खून झालाय आणि तिच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत तुमचे नाव आणि नंबर सापडल्याने तुम्हाला चौकशीसाठी इंदौर क्राइम ब्रांचसमोर यावे लागेल

मुंबई : ‘इंदौरमध्ये एका महिलेचा खून झालाय आणि तिच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत तुमचे नाव आणि नंबर सापडल्याने तुम्हाला चौकशीसाठी इंदौर क्राइम ब्रांचसमोर यावे लागेल’ असा एक फोन बोरीवलीतील व्यक्तीला आला आणि त्याचे धाबे दणाणले. फोन करणाऱ्याने तो क्राइम ब्रांचचा अधिकारी असल्याचे सांगत प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाखांची मागणीही केली. मात्र वेळीच क्राइम ब्रांचच्या युनिट अकराने छडा लावत तोतया अधिकारी बनलेल्या ज्योतिषाचा गुरुवारी पर्दाफाश केला.देवांग पांडे (३०) असे या अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. तो मूळचा विरारचा राहणारा आहे. स्वत:ला पत्रकार आणि ज्योतिषी म्हणवणाऱ्या पांडेने ३१ आॅगस्ट रोजी विवेक (नावात बदल) याला फोन करत महिलेच्या खुनाची खोटी कहाणी सांगत गोरेगाव पोलीस ठाण्यात बोलावले. या फोननंतर धास्तावलेला विवेक रात्री दहाच्या सुमारास पांडेला गोरेगाव पोलीस ठाण्यात भेटण्यास गेला आणि त्याने पांडेला फोन केला. तेव्हा मी तुझी बराच वेळ वाट पाहून निघून गेल्याचे पांडेने विवेकला सांगितले. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन करून पांडेने विवेकच्या घरचा पत्ता मागितला आणि तो त्याच्या बोरीवलीतील घरी जाऊन धडकला. तेव्हा पांडेने विवेकच्या घराची झडती घेतली. ‘इंदौर क्राइम ब्रांचच्या लोकांशी माझी ओळख असून आपण हे प्रकरण मिटवू, मात्र त्यासाठी मला पाच लाख रुपये द्या’, असे पांडेने विवेकला सांगितले.विवेकने क्राइम ब्रांचच्या कक्ष अकराकडे संपर्क साधला. पैसे देण्याची तयारी दर्शवत पांडेला बोरीवली रेल्वे स्थानकाजवळ बोलावून त्याला अटक करण्यात आली.