Join us
Daily Top 2Weekly Top 5

साहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच घेताना अटक

By admin | Updated: May 23, 2014 02:48 IST

मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणार्‍या साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तुकाराम हुलावले (४५) यांना ५० हजार रुपये लाच घेताना अटक केली आहे.

नवी मुंबई : मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणार्‍या साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तुकाराम हुलावले (४५) यांना ५० हजार रुपये लाच घेताना अटक केली आहे. कळंबोलीमध्ये ही कारवाई करण्यात आली. मुरबाड पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीस पोलीस कोठडी वाढवून घेऊ नये, यासाठी राजेंद्र हुलावले यांनी आरोपीच्या चुलत भावाकडे ५० हजार रुपये लाच मागितली होती. याविषयी संबंधित व्यक्तीने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाच घेण्यासाठी संबंधितांना कळंबोलीमधील मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला होता. आज सायंकाळी साडेचार वाजता पैसे स्वीकारत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.