सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवित असल्याचा संशय असलेल्या सहायक दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी ताब्यात घेतले. अनेक महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्याच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
सुशांतसिंहचा जवळचा मित्र व सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेला पवार अनेक महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होता. सुशांतला तसेच बॉलिवूडमध्ये अनेकांना तो ड्रग्ज पुरवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. एनसीबीने त्याला चौकशीसाठी अनेकवेळा समन्स बजावले होते. पण विविध कारणांनी तो टाळाटाळ करीत होता. एनसीबीच्या पथकाने ऋषिकेशच्या चेंबूरच्या घरी छापा टाकला होता. मात्र त्यापूर्वी तो तेथून फरार झाला होता. मंगळवारी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात नेण्यात आले. सुशांतसिंहचे ड्रग्जचे व्यसन, त्याची पूर्तता तो कोणाकोणाकडून करीत होता, त्याने कोणाला ड्रग्ज पुरवले, ते काेठून आणले, याबाबत त्याच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आली.
........................