Join us  

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वयंसेवी संस्थांना मेल्टिंग पॉटच्या माध्यमातून मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 12:57 AM

२८ देशांच्या राजदूतांचा सक्रिय सहभाग; २० वर्षांपूर्वी झाली होती उपक्रमाला सुरुवात

मुंबई : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चार स्वयंसेवी संस्थांना पुढील सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मेल्टिंग पॉट (कॉन्सुलर कॉर्पस चॅरिटी कार्निव्हल) या कार्यक्रमाद्वारे हातभार लावण्यात आला. आइसलँडचे राजदूत गुल कृपलानी यांच्या पुढाकाराने २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला होता. यंदा तब्बल २८ देशांच्या राजदूतांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना निधी उपलब्ध करून दिला जातो.मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा, कृपलानी, राजश्री बिर्ला, पिलू टाटा, प्र्रकाश जैन, मधुसूदन अग्रवाल व विविध देशांचे राजदूत उपस्थित होते. गुडमुंडूर स्टेफनसन व रवांडाचे उच्चायुक्त अर्नेस्ट ºवामुक्यो यांनीदेखील उपस्थितांचे स्वागत केले. २८ देशांच्या राजदूतांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला जणू मिनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले होते.कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी काम करणाऱ्या कॅनकिडस इंडिया, जव्हार तालुक्यात गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत प्रगती प्रतिष्ठान, पालघर जिल्ह्यातील धरणांसाठी कार्यरत लायन्स क्लब व गरीब, युवावर्गात फुटबॉलबाबत प्रशिक्षण देऊन प्रगतीसाठी झटणाºया आॅस्कर फाउंडेशन या संस्थांची निवड या वेळी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या कामगिरीबाबत माहिती दिली व सादरीकरण, मुलाखती घेऊन त्यामधून या चार संस्थांची निवड करण्यात आली. विविध देशांच्या खाद्य संस्कृतीची ओळख करणाºया विविध स्टॉलमुळे या वेळी आंतरराष्ट्रीय फूड फेस्टिव्हल प्रमाणे वातावरण निर्मिती झाली होती. कृपलानी यांनी अशा कार्यक्रमांची गरज व्यक्त केली व पहिल्या मेल्टिंग पॉट कार्यक्रमाच्या माध्यमातून ओडिशामधील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचे स्मरण केले.भारतीय पारंपरिक नृत्य प्रकार असलेल्या कथ्थक व स्पॅनिश पारंपरिक नृत्य फ्लेमेन्कोद्वारे मनोरंजनात्मक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दोन कला व चित्र प्रदर्शनाच्या लिलावातून मिळालेली रक्कम व विविध कलाकारांनी सादर केलेल्या अदाकारीद्वारे मिळालेल्या निधीचे चार स्वयंसेवी संस्थांना वितरण करण्यात आले. जगभरातील विविध देशांच्या नागरिकांनी या वेळी विविध देशांच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला व स्वयंसेवी संस्थांसाठी निधी उपलब्ध करून दिला.अर्जेंटिना, बेल्जियम, कॅनडा, चीन, इथिओपिया, गॅबोन, हंगेरी, आइसलँड, आयर्लंड, इस्रायल, केनिया, इंडोनेशिया, नेदरलँडस, पोलंड, रशिया, रवांडा, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, दक्षिण कोरिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, युगांडा, युनायटेड किंगडम, झिम्बाब्वे, तुर्कस्थान, स्पेन या देशांचे राजदूत या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :विजय दर्डा