Join us

शेतकरी कुटुंबांच्या परिस्थितीचे होणार मूल्यांकन; वर्षभर मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 04:10 IST

शेतकरी कुटुंबाची जमीन, पशू धारणा आणि एकूणच परिस्थितीची मूल्यांकन पाहणी करण्यात येणार असून ही पाहणी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत होईल.

मुंबई : शेतकरी कुटुंबाची जमीन, पशू धारणा आणि एकूणच परिस्थितीची मूल्यांकन पाहणी करण्यात येणार असून ही पाहणी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत होईल. राज्यातील सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाºयांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक र. र. शिंदे यांनी केले आहे.राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या नवी मुंबई स्थित कार्यालयातील उप महासंचालक सुप्रिया रॉय यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.ही पाहणी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून कर्जे व गुंतवणूक या विषयाची देखील माहिती घेतली जाणार आहे. या पाहणीअंतर्गत शेतकरी कुटुंबांचे आर्थिक राहणीमान, ताब्यातील जमीन, पीक लागवडीखालील क्षेत्र, उत्पन्न व खर्च, पिकांना मिळणारी आधारभूत किंमत, सिंचनाचे स्त्रोत, शेतकरी कुटुंबाकडे असलेले पशुधन व त्यापासून मिळणारे उत्पन्न, यासारखी माहिती गोळा करण्यात येईल.>धोरण, योजना आखण्यास मदतग्रामीण व नागरी भागाकरिता निवड केलेल्या कुटुंबाकडे त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांच्यावर असलेले कर्ज, त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्ता आणि दायित्वे (व्यवसायासह) याबाबतची विस्तृत माहिती गोळा करण्यात येईल. या पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय, तसेच राज्य पातळीवरील विविध धोरणे आखण्यासाठी, तसेच नियोजनासाठी केला जातो. त्यामुळे या पाहणीसाठी अचूक आणि परिपूर्ण माहिती देणे गरजे आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.