Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापलेकीवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:07 IST

मुंबई : जागेच्या वादातून एका माथेफिरूने बापलेकीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ६) घाटकोपरमध्ये घडली. या प्रकरणी हत्येच्या ...

मुंबई : जागेच्या वादातून एका माथेफिरूने बापलेकीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ६) घाटकोपरमध्ये घडली. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. वडील आणि मुलीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

....................................

‘त्या’ चौकडीकडे कसून चौकशी

मुंबई : अंधेरीतील सहार रोडवरील एका गोदामावर छापा टाकून गुन्हे शाखेने तब्बल पावणेदोन कोटींचे रक्तचंदन जप्त केले. याप्रकरणी गुन्हे शाखेने प्रसाद खामकर, मनीष तात्याने, निशांत मल्होत्रा आणि हरींद्र तिवारी यांना अटक केली. यात आणखी कितीजणांचा हात आहे? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

......................

सोशल मीडियावर सायबर सेलचा वॉच

मुंबई : कडक निर्बंधांच्या काळात सोशल मीडियावरून कोणीही अफवा पसरवू नयेत असे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. अशात, सोशल मीडियाच्या हालचालींवर सायबर सेल लक्ष ठेवून असल्याचेही मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून सांगितले आहे.

....