नवी मुंबई : शिरवणे गाव येथे राहत्या घरात महिलेची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. मिनाक्षी सोनी (३०) असे मयत महिलेचे नाव आहे. शिरवणे गाव येथील साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मिनाक्षी यांचा मृतदेह घरमालक अनुप सुबल यांना हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. अज्ञात व्यक्तीने गळा दाबून त्यांची हत्या केली. सुबल यांनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी आकाश ऊर्फ छोटू नावाच्या व्यक्तीवर संशय असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तिच्या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}