Join us

थकीत वेतनासह दिवाळीच्या सुट्टीसाठी तगादा लावणाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:34 IST

आरोपीला मुंबईतून अटक, गुन्हे शाखेची कारवाईथकीत वेतनासह दिवाळीच्या सुट्टीसाठी तगादा लावणाऱ्याची हत्याआरोपीला मुंबईतून अटकलोकमय न्यूज नेटवर्क...

आरोपीला मुंबईतून अटक, गुन्हे शाखेची कारवाई

थकीत वेतनासह दिवाळीच्या सुट्टीसाठी तगादा लावणाऱ्याची हत्या

आरोपीला मुंबईतून अटक

लोकमय न्यूज नेटवर्क

मुंबई : थकीत वेतनासह दिवाळीच्या सुट्टीसाठी तगादा लावणाऱ्या रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करत त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मुंबईत पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. वरुण वीरेंद्र व्यास असे अटक आरोपीचे नाव आहे.

राजस्थान येथील चितोडगड सांवलियाजी राजकीय सामान्य चिकित्सालयात मेहर काम करत होता. दिवाळी जवळ आल्याने त्याने कॅन्टीन चालकाकडे थकीत वेतनासह दिवाळी सुट्टीसाठी तगादा लावला. याच रागात १५ नोव्हेंबर रोजी त्याला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. यातच रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चितोडगड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

व्यास हा मीरा रोड परिसरात वावरत असून, मंगळवारी दहिसर नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या कक्ष १२ने सापळा रचून त्याला अटक केली. व्यास सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध मुंबई, रायगड आणि कर्नाटकमध्ये चोरी, मारहाण, फसवणुकीचे ६ गुन्हे नोंद आहेत.

...................