* मुलुंड पोलिसांकडून दोन तास चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - भाजपाचे माजी खासदार किरीट सौमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांनी शनिवारी सुमारे दोन तास चौकशी केली. एका ठेकेदाराविरुद्धच्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेच गरज वाटल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी पुन्हा बोलवण्यात येईल, असे सांगण्यात आले.
मुंबई महापालिकेची कामे करीत असलेल्या एका ठेकेदारास खंडणीसाठी तिघांनी धमकाविले होते. त्याबाबत त्याने गेल्यावर्षी त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हा खंडणीचा प्रकार नील सोमय्या यांच्या कार्यालयात झाला होता. मात्र, त्यावेळी सोमय्या तेथे उपस्थित नव्हते, असे त्याने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या अनुषंगाने नील सोमय्या यांना शनिवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास कळविले होते. त्यानुसार दुपारी त्यांच्याकडे सविस्तर माहिती घेऊन जबाब नोंदविण्यात आला आहे.