Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता महेश मांडगावकरचा केला सन्मान

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 10, 2023 00:49 IST

खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली येथील निवासस्थानी जाऊन केला सत्कार

मनोहर कुंभेजकर, मुंबई: आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता महेश मांडगावकर याने बलाढ्य स्क्वॉश संघ पाकिस्तानला पराभूत करून तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा गौरव केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याना सुवर्णपदक मिळाले आहे. सदर स्पर्धेत पाकिस्तान संघाला पराभूत करून बोरिवलीचा आणि महाराष्ट्राची शान वाढवल्याचे गौरवोद्गार खासदार गोपाळ शेट्टी यांनी काढले.

महेश मांडगावकर यांचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी जावून भेटवस्तू पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. सदर स्पर्धेत बलाढ्य स्क्वॉश संघ पाकिस्तानला पराभूत करून तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा गौरव केला आहे.त्यामुळे बोरिवलीची आणि महाराष्ट्राची शान वाढल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी पोइसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संस्थापक सदस्य करुणाशंकर ओझा, माजी नगरसेवक जगदीश ओझा, दीपक पाटणेकर, रामेश्वर डागा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई