Join us  

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता म्हणून अश्वनी सक्सेना यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 10:37 PM

अश्वनी सक्सेना यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत.  

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य अभियंता पदाचा अभियंता अश्वनी सक्सेना यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे.  १९८७ मध्ये त्यांनी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी केली आहे.

सक्सेना यांनी सहाय्यक अभियंता, चक्रधरपूर विभाग, पूर्वीच्या दक्षिण-पूर्व रेल्वेच्या बिलासपूर विभागात विभागीय अभियंता आणि वरिष्ठ विभागीय अभियंता, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य ट्रॅक अभियंता म्हणून काम केले आहे.  प्रधान मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते मध्य रेल्वेचे मुख्य ट्रॅक अभियंता म्हणून कार्यरत होते. 

अश्वनी सक्सेना यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत.  त्यांनी रेल्वेमध्ये ३३ वर्षांची सेवा केली आहे.  त्यांनी राजस्थान सरकारच्या नगरविकास विभागात आयुक्त रेल्वे, राजस्थान अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक, जयपूर मेट्रोमधये संचालक / प्रकल्प म्हणून काम केले आहे.  त्यांच्याकडे भारतीय रेल्वेवरील सामान्य प्रशासनाबरोबरच व्यवस्थापन आणि निर्माण  कार्याचा विस्तृत अनुभव आहे.

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई