Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांच्या प्रवक्तेपदी अशोक दुधे

By admin | Updated: June 14, 2016 03:18 IST

मुंबई पोलीस आयुक्तांच्या प्रवक्तेपदी उपायुक्त (अभियान) अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्याकडून पदभार स्वीकारला.

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तांच्या प्रवक्तेपदी उपायुक्त (अभियान) अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्याकडून पदभार स्वीकारला.दुधे हे परिमंडळ-४ च्या उपायुक्तपदी कार्यरत होते. नुकत्याच आयुक्तालयांतर्गत झालेल्या बदल्यामध्ये त्यांची मुख्यालयात (अभियान) नियुक्ती करण्यात आली. याठिकाणचे उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपला पदभार दुधे यांच्याकडे सोपविला. गेल्या सुमारे साडेतीन वर्षांपासून मुंबई आयुक्तालयांर्गत पोलीस व गुन्हे वृत्तासंबंधी अधिकृत माहिती, प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवक्तेपदाचा पदभार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात येतो. माजी आयुक्त अरुप पटनायक यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा हे पद तयार करण्यात आले. (प्रतिनिधी)