Join us

अशोक चव्हाण यांच्याविरूद्धच्या खटल्यास नकार

By admin | Updated: July 26, 2014 02:40 IST

राज्यपालांनी नाकारलेल्या परवानगीवर आम्ही आक्षेप घेऊ शकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी सीबीआयने उच्च न्यायालयात सादर केल़े

मुंबई : आदर्श सोसायटी इमारत घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी नाकारलेल्या परवानगीवर आम्ही आक्षेप घेऊ शकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी सीबीआयने उच्च न्यायालयात सादर केल़े
या घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असून चव्हाण यांच्यावर खटला चालवण्यासाठी दाखल झालेली याचिका फेटाळून लावावी, अशी मागणीही सीबीआयने केली आह़े न्या़ हरदास यांच्या खंडपीठासमोर  सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने याचे दोन आठवडय़ात प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना दिल़े (प्रतिनिधी)