Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशिष शेलारांना दुसरी टर्म

By admin | Updated: July 5, 2016 01:34 IST

राज्य मंत्रिमंडळातील समावेशाची इच्छा असणारे आमदार आशीष शेलार यांना मुंबई अध्यक्ष पदावरच समाधान मानावे लागणार आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत शेलार यांना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील समावेशाची इच्छा असणारे आमदार आशीष शेलार यांना मुंबई अध्यक्ष पदावरच समाधान मानावे लागणार आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत शेलार यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बुधवारी पक्षाच्या मेळाव्यात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. मुंबईतील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देत पक्षाच्या विस्तारासाठी शेलार यांच्याकडेच अध्यक्षपद कायम ठेवण्याचे धोरण आहे. शेलार यांनी अध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेला लक्ष्य केले होते. मुंबईत स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आक्रमक नेतृत्वाची आवश्यकता आहे. या उद्देशानेच शेलार यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते अतुल शाह यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)