Join us

‘आशा’ सेविकांच्या निधीचा घोळ

By admin | Updated: February 12, 2015 22:36 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या आशा स्वयंसेविकांच्या हक्काचे पैसे परस्पर वेगळ््या कारणासाठी खर्च करणा-या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील यांनी दिले.

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या आशा स्वयंसेविकांच्या हक्काचे पैसे परस्पर वेगळ््या कारणासाठी खर्च करणा-या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील यांनी दिले.आशा स्वयंसेविका कर्मचारी संघाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आशा स्वयंसेविका कर्मचारी संघाच्या नियोजीत मोर्चाला सामोरे जाण्यास रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी नसल्याने आंदोलकांनी सुनिल पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत (एनआरएचएम) आशा स्वयंसेविकांसाठी आलेल्या निधीतील सुमारे दहा लाख रुपये परस्पर वळविण्यात आल्याचे वास्तव समोर आले. आशा स्वयंसेविकांच्या हक्काची रक्कम कोणी खर्च करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम सुनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.