Join us  

अरविंद केजरीवाल यांच्यासह सात जणांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 7:29 AM

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांकडून परवानगी न घेताच मानखुर्दमध्ये सभा घेतल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

मुंबई : २०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांकडून परवानगी न घेताच मानखुर्दमध्ये सभा घेतल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. शुक्रवारी शिवडी न्यायालयाने या सर्वांची सुटका करत मोठा दिलासा दिला.अरविंद केजरीवाल यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पााटकर, मीरा सन्याल व आपच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून परवानगी न घेताच सभा घेतल्याबद्दल पोलिसांनी या सर्वांवर भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला.या सर्वांची सुटका करताना दंडाधिकारी पी. डी. देशपांडे यांनी म्हटले की, पोलिसांनी आरोपींना परवानगी न दिल्याबद्दल लेखी कळविले नाही. तसेच त्यांच्यावर सभा घेण्याबाबत प्रतिबंध घालण्यात आला नव्हता. याबाबत इलेक्ट्रॉनिक पुरावा नाही व पोलिसांनी आरोपींचा जबाब नोंदविण्यास विलंब केला.२०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी आप पक्षातर्फे मेधा पाटकर व मीरा सन्याल उभ्या होत्या. त्यांच्या प्रचाराकरिता सभा घेण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना बोलविण्यात आले होते. ही सभा अनिश्चित होती आणि वाहतूक पोलिसांची परवानगी न घेताच आयोजित करण्यात आली, असा दावा पोलिसांनी केला आहे.मार्च २०१४ मध्ये केजरीवाल यांच्याविरुद्ध मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. निकालाच्या वेळी केजरीवाल, मीरा सन्याल व अन्य कार्यकर्ते न्यायालयात उपस्थित होते. मात्र, या वेळी मेधा पाटकर अनुपस्थित होत्या.

टॅग्स :अरविंद केजरीवालबातम्या