मृत्यूची अफवा : रुग्णालय अधिष्ठातांचे स्पष्टीकरणमुंबई : गेल्या चार दिवसांपासून अरुणा शानबाग यांच्या खालावलेल्या प्रकृतीत शनिवार सकाळपासून सुधारणा होत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी अरुणा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी त्यांच्या काही चाचण्या केल्यावर त्यांना न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. प्रकृतीत आणखी थोडी सुधारणा झाल्यावर व्हेंटिलेटर काढण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागात ४ ते ५ डॉक्टरांचे पथक आणि ३ ते ४ परिचारिका त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यकता भासल्यास इतर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाईल, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.
अरुणांची प्रकृती चिंताजनक
By admin | Updated: May 17, 2015 02:08 IST