Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2024 20:00 IST

मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये एका दिमाखदार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने भारतीय कलाकार पराग बोरसे यांना २०२४ वर्षातील बहुमोल समजला जाणारा "फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल" पुरस्कार जाहीर केला आहे. २२ सप्टेंबर २०२४ रोजी मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये एका दिमाखदार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

न्यूयॉर्कमध्ये भरणाऱ्या 'एंडूरिंग ब्रिलियंनस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या  वार्षिक  आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे ५२ वें वर्ष आहे. यावर्षी अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून ११५५ सबमिशन प्राप्त झाली आहेत . त्यांनी समावेशासाठी केवळ १२५ कलाकृती निवडल्या आहेत. पराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले 'ए टर्बन गेझ' हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्तिचित्रण आहे. पराग बोरसे यांच्या या चित्राची पुरस्काराकरिता निवड  जेरेनिया विल्यम मॅककारथी (द वेस्ट मोरलॅंड म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट,ग्रीन्सबर्ग, पेन्सिल्वेनियाचे मुख्य आर्ट  क्युरेटर) या पंचांनी केली आहे. रोख एक हजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

पराग बोरसे हे एकमेव भारतीय कलाकार आहेत ज्यांच्या कलाकृतीची या संस्थेने आपल्या वार्षिक प्रदर्शनासाठी चार वेळा निवड केली आहे . पराग बोरसे यांना  यापूर्वी दोन वेळा पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट अमेरिका यांनी पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे, तसेच अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या पेस्टल जरनल या मासिकानेसुद्धा त्यांना दोन वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

टॅग्स :मुंबई