Join us  

एफडीए फळ विक्रेत्यांना समजवणार कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा धोका, राज्यभरात कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 3:17 AM

एप्रिल-मे महिना हा आंब्याचा हंगाम असून, बाजारातमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणासह इतर राज्यांतून आंबे विक्रीसाठी येतात, परंतु यात कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्यांची विक्री केली जाते.

मुंबई - एप्रिल-मे महिना हा आंब्याचा हंगाम असून, बाजारातमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणासह इतर राज्यांतून आंबे विक्रीसाठी येतात, परंतु यात कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्यांची विक्री केली जाते. हे आंबे हे मानवी शरीरासाठी घातक असतात. ग्राहकांच्या हितासाठी पुढाकार घेत अन्न व औषध प्रशासना(एफडीए)ने नैसर्गिकरीत्या आंबा पिकविण्याबद्दलची माहिती मुंबईसह राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)तील फळविक्रेत्यांना देत आहेत.अन्न व औषध प्रशासनातर्फे मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, औरंगाबाद विभागातील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)मधील फळ विक्रेत्यांना कृत्रिमरीत्या फळे पिकविणे हे ग्राहकांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, याबाबत कार्यशाळा घेऊन माहिती दिली. काही ठिकाणी कार्यशाळा पार पडल्या असून, काही ठिकाणी कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. या कार्यशाळेतून कॅल्शियम कार्बाईड कसे वापरू नये आणि इथेफॉन पावडर कसे वापरावे; याबद्दलची माहिती फळ विक्रेत्यांना देण्यात आली. मुख्यत्वे एपीएमसी मार्केटमधूनच इतर ठिकाणी आंबे विक्रीसाठी जातात. त्यामुळे एफडीएने एपीएमसी मार्केटवर लक्ष केंद्रित करून जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होऊ नये, याकडे एफडीए लक्ष ठेवून आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनीया संदर्भात सांगितले की, कृत्रिमरीत्या आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. कॅल्शियम कार्बाईडआता वापरता येत नाही, याबद्दल खूपदा फळ विक्रेत्यांमध्येजनजागृती नव्हती. अन्नसुरक्षा कायद्यानुसार, इथेफॉन पावडर वापरून आंबा पिकविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून एफडीएने राज्यातील एपीएमसी मार्केटमध्ये जाऊन फळविक्रेत्यांसाठी कार्यशाळा घेऊन जनजागृती केली जात आहेत.कॅल्शियम कार्बाईडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे गुणधर्म असतात, जे मनुष्यासाठी हानिकारक असून चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, जळजळ होणे, अशक्तपणा, गिळण्याची अडचण, उलट्या, त्वचेचा अल्सर इत्यादी रोग होतात. कॅल्शियम कार्बाईडपासून मुक्त होणारे अ‍ॅसिटीलीन वायू हँडलर्सना तितकाच हानिकारक आहे. त्यामुळे फळे पिकविण्याकरिता कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यास देशात सक्त मनाई आहे.

टॅग्स :आंबाएफडीए