Join us

खडूतून साकारली विद्यार्थ्याने कला

By admin | Updated: November 17, 2014 23:42 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्याने खडू व पेन्सिलीतून कला साकारली आहे. त्याने आपला कलेचा छंद जोपासण्यासाठी त्याने खडू व पेन्सीलचा वापर केला आहे.

शशिकांत ठाकूर, कासाडहाणू तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्याने खडू व पेन्सिलीतून कला साकारली आहे. त्याने आपला कलेचा छंद जोपासण्यासाठी त्याने खडू व पेन्सीलचा वापर केला आहे.लहानपणीच काही मुलांना विविध छंद जडतात व पुढे त्याच कलेची जोपासना करत ते आपले आयुष्य उज्ज्वल बनवितात. काही आपल्या छंद व कलेची आवड पूर्ण करण्यासाठी आर्थिक कठीण परिस्थितीवरही मात करतात. तालुक्यात कासा भागातील अलय प्रजापती या विद्यार्थ्यास अशाच कलेचे वेड आहे. त्याने खडूवर विविध ऐतिहासिक शिल्पे, मूर्ती, पुतळे कोरली आहेत. खडूबरोबरच पेन्सीलींवरही त्याने सुंदर चित्रे काढली आहेत. खडूवर शिवाजी महाराजांचे सुंदर चित्र कोरले आहे. या चित्रांचे विशेष कौतुक होत आहे. याशिवाय, त्याने खडूवर ताजमहल, आयएफए अ‍ॅवॉर्ड तर पेन्सीलवर गणपती, लॉकेट, विविध देवांची व खेळाडूंची चित्रे कोरली आहेत. या कलेसाठी सुईची आवश्यकता असते, असे त्याचे म्हणणे आहे.