हुसेन मेमन, जव्हारहिंदू बांधवांचा पवित्र आणि लाडका म्हणजे गणपती बाप्पा. याच गणेशोत्सवाची जय्यत तयारी सध्या परिसरात सुरू आहे. गांधी चौकाच्या पुढील देवस्थान कमिटीच्या पडीक गाळ्यात, जव्हार मार्केटमध्ये आणि परिसरात सुबक व आकर्षक मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या आठवड्याभरात येणाऱ्या लाडक्या बाप्पाच्या तयारीत सारेच गुंतलेले आहेत. अधूनमधून भक्तगण आपल्या मूर्तीची पाहणी करून जात असून योग्य त्या सूचनाही मूर्तिकारांना करत असल्याचे कारागिरांनी सांगितले. जव्हार तालुक्यात आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून दरवर्षी हजारो गणेशमूर्ती भाविक खरेदी करतात, त्याचप्रमाणे तालुक्यातूनही मूर्ती घेऊन ठिकठिकाणी विकतात. मनमोहक आणि सुंदर अशा मूर्तींची निवड करण्याकरिता आपल्या घरच्या मंडळींची मदत घेतात.
आगमन जवळ आल्याने गणेशमूर्तिकारांची लगीनघाई
By admin | Updated: August 24, 2014 23:25 IST