लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून भेसळयुक्त दुधाची विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने अटक केली. त्याच्याकडून २४८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले.
मालाड येथील मकरानी पाड्यात एक जण भेसळयुक्त दुधाची विक्री करत असल्याची माहिती कक्ष १२ चे पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने बुधवारी सकाळी येथे छापा टाकला. तेव्हा काही जण नामांकित दूध पिशव्यांमधील काही दूध बाजूला काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळत असल्याचे दिसून आले. पथकाने घटनास्थळावरून २४८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले.
याप्रकरणी श्रीनिवास उर्फ श्रीनू व्यंकय्या थंडू (४०) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
.........................................................