Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉस्को’प्रकरणी प्राचार्याला अटक

By admin | Updated: September 12, 2015 03:52 IST

अंधेरी पूर्वच्या एका नामांकित शाळेच्या प्राचार्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्कोअंतर्गत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई : अंधेरी पूर्वच्या एका नामांकित शाळेच्या प्राचार्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्कोअंतर्गत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. पूनमनगर परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात हा पीडित सहा वर्षीय मुलगा शिकतो. ३१ आॅगस्ट रोजी शाळेच्या प्राचार्याने त्याच्यासोबत अश्लील चाळे केले. ही तक्रार बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकरणी सखोल चौकशी करत शुक्रवारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याला शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)