Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला अटक

By मनीषा म्हात्रे | Updated: February 8, 2024 19:35 IST

पत्नीची हत्या करून पसार झालेल्या राजेश यादव याला गुन्हे शाखेने गाझीपूर भागातून अटक केली आहे.

मुंबई: पत्नीची हत्या करून पसार झालेल्या राजेश यादव याला गुन्हे शाखेने गाझीपूर भागातून अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या केलयाची माहिती समोर येत आहे. कांजूरमार्ग येथील नेहरूनगर परिसरात दोन महिन्यापूर्वीच दीपा यादव (२२) पतीसोबत राहण्यास आली होती. मंगळवारी दीपाचा हात पाय बांधून बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पतीही गायब असल्याने पोलिसांनी शोध सुरु केला.

गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही याचा समांतर तपास सुरु केला. आरोपी गावी उत्तरप्रदेशला पळून गेल्याच्या शक्यतेतून गुन्हे शाखेने त्याचे गाव गाठले. मात्र आरोपी तेथे मिळून आला नाही. आरोपी गाझीपूर भागात असल्याचे समजताच पथकाने तेथे धाव घेत त्याला अटक केली आहे. आरोपी नशेच्या आहारी गेला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तो पसार झाला होता. ४ तारखेला शेवटचा कामावर गेला. त्यानंतर तो गायब होता. अखेर पथकाने त्याला बेड्या ठोकलया आहेत.

टॅग्स :मुंबईअटक