नवी मुंबई : बलात्कार प्रकरणी कोपर खैरणो पोलिसांनी चार वर्षानी एकाला अटक केली आहे. शुक्रवारी घोडबंदरमध्ये सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तर त्याला मदत करणा-या मित्रचा शोध घेत आहेत.
घोडबंदर सप्टेंबर 2क्क्9 साली कोपर खैरणो पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. जोगेश्वरी येथे राहणारी 19 वर्षीय तरुणीने यासंबंधीची तक्रार केली होती. ही तरुणी काम करत असलेल्या टूर्स एजन्सी चालक सुर्यकांत बैत याने तिच्यावर वसई आणि फाम सोसायटीतील मित्रच्या कार्यालयात बलात्कार केला होता. अखेर 5 जानेवारी 2क्1क् रोजी या तरुणीने बैत याच्याविरोधात कोपर खैरणो पोलिसांकडे तक्रार केली होती. सुर्यकांत बैत हा घोडबंदर परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक नाईक यांच्या पथकाने कारवाई केली. (प्रतिनिधी)