मुंबई : बँक आॅफ बडोदाच्या उत्तर प्रदेशमधील दोन शाखांमध्ये दरोडा टाकून फरार झालेल्या सरोज या आरोपीला बुधवारी गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९च्या पथकाने अटक केली. त्याच्यावर उत्तर प्रदेश सरकारने एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.सरोज हा दिवा परिसरात त्याच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती कक्ष ९चे प्रमुख महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला पकडले व उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. सरोज सराईत गुन्हेगार आहे. त्याने सप्टेंबरमध्ये अन्य चार साथीदारांसह बँक आॅफ बडोदाच्या दोन शाखांत दरोडा टाकला. शस्त्राचा धाक दाखवत त्याने १३ लाख पळवले.
उत्तर प्रदेशातील फरार आरोपीला दिव्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:03 IST